बकऱ्या चोरी प्रकरणातील जप्त केलेली रक्कम ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केली फिर्यादीच्या सुपूर्द...


जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या शेत शिवारातील गट नंबर 74 मधील कुटे यांच्या शेतामधून दिनांक 16 आक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांनी दहा बकऱ्या व दोन बोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. सदर घटनेची तक्रार गोदावरी प्रकाश जाधव 55 वर्ष राहणार जळगाव जामोद यांनी पोलीस स्टेशनला दिली होती. ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे, योगेश निंबोळकर, अनिल बुले यांनी तपास करून आरोपींना जेर बंद केले व त्यांच्या ताब्यातून बकऱ्या विकून चोरट्यांनी जमा केलेले 57 हजार रुपये जप्त करण्यात आले होते. आज दिनांक 19 डिसेंबर रोजी कोर्टाच्या आदेशाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी पंचांच्या समक्ष सौ गोदावरी प्रकाश जाधव यांना सुपूर्द नाम्यावर जप्त केलेली नगद 57 हजार रुपयाची रक्कम शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ, शिवसेना शहरप्रमुख रमेश ताडे,विशाल पाटील, यशवंत झुंझारे, पोलीस हेड मोहरर सोळंके त्यांच्या समक्ष देण्यात आली.. यावेळी गोदावरी प्रकाश जाधव यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

Previous Post Next Post