जलंब चोरीचा मोबाईल विकत घेणाऱ्या 30 वर्षीय युवकाला जलंब पोलिसांनी अटक केली असल्याची घटना दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास माटरगाव येथे घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त असे की जलंब पोस्टे अंतर्गत येथून जवळच असलेल्या पहूरजीरा ता. शेगाव येथील रहिवाशी संतोष वामन पारसकार वय 33 वर्ष याचा विवो कंपनीचा 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेला होता याप्रकरणी जलंब पोलिसांनी अप नंबर 62/2022 कलम 457,380 भादवि अन्वे. गुन्हा दाखल केला होता त्यामुळे सदर गुन्हयाचा तपास जलंब पोलिसांनी सायबर सेल बुलढाणा यांच्या मदतीने व तांत्रिक बाबीच्या आधारे सखोल तपास करून चोरीचा मोबाईल विकत घेणाऱ्या विशाल निरंजन वानखडे वय 30 वर्ष रा. माटरगाव ता. शेगाव याला दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घरून ताब्यात घेऊन अटक केली आहे. व त्याच्या जवळून चोरी गेलेला विवो कंपनीचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धीरज बांडे, पोहेका सुभाष चोपडे, विजय जाधव, धर्मेंद्र निंबाळकर, गोपाल सोनोने, संदीप गावंडे आदींनी केली आहे. जलंब पोस्टे हद्दीतील नागरिकांनी कोणत्याही अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून जुना मोबाईल विकत घेताना सदर मोबाईल खरेदी केल्याची बिल पावती असल्याशिवाय जुना मोबाईल विकत घेऊ नये असे आव्हान ठाणेदार धीरज बांडे यांनी केले आहे.
चोरीचा मोबाईल विकत घेणाऱ्या माटरगाव येथील युवकाला जलंब पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
