राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी पासून जवळ असलेल्या टीटंबा येथें आज दुपारी सुंदरलाल पटोरकर वय 55 या युवकाचा रोटावेटर मध्ये अडकून मृत्यू झाल्याने टिटमबा गावात शोककळा पसरली आहे.टीटंबा येथें मानव मिशन अंतर्गत बचत गटाला मिळालेल्या ट्रॅक्टर धर्मेंद्र मावसकर यांचे कडे आहे. सदर ट्रक्टर ड्राइवर चुन्नीलाल जावरकर वय 38 रोटवेटर घेऊन गेला असता त्याच्यासोबत सुंदरलाल पटोरकर वय 55 गेला. व तो ड्राइव्हर च्या बाजूला बसून होता. ट्रॅक्टर चालू असताना सुंदरलाल चा संतुलन बिघडून खाली पडल्याने रोटर मध्ये आला व त्यात अडकून सुंदरलाल पटोरकर चा मृत्यू झाला.पोलीस जमादार गणेश घुले सह पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा केला असूनशव उपजिल्हा रुग्णालय धारणी येथें उत्तरीय तपासणी साठी पाठविला आहे.
