गाविलगड शौर्य दिवस साजरा होणार..गाविलगड चा इतिहास प्राक्रमाने भरलेला: वीर योद्धा बेनी सिंह यांची वीरगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत..।


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची ऐतिहासिक धरोहर असलेला गाविलगड किल्ल्यावर वीर योद्धांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच वीर योद्धा बेनीसिंह यांच्या कृतज्ञतेप्रति त्यांना मानवंदना देण्याच्या अनुषंगाने स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारे दरवर्षी गाविलगड शौर्य दिनाचे आयोजन केले जाते यंदा या महोत्सवाचे सहावे वर्ष असून त्यानिमित्ताने दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने चिखलदरा येथे करण्यात येणार असल्याची माहिती स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा काळे तसेच सचिव प्रतीक पाथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवा काळे यांनी सांगितले की विदर्भाच्या कुशीत वसलेल्या गाविलगड किल्ला अनेक राजकीय सत्तांचा महामेरू होता अकराव्या शतकात गवळी राजाने या किल्ल्याची स्थापना केली होती शिवकाळानंतर शाहू महाराजांनी नागपूरच्या भोसलेंकडे या किल्ल्याची जबाबदारी दिली होती गाविलगड किल्ल्याचा समृद्ध खजिना अनेक वर्ष जपण्याचे काम त्यानंतर त्यांनी केले १८०३ साली इंग्रजांना मराठ्यांचा हा खजिना लुटून भारतात आपले पाय रोहायचे होते त्यावेळी बेनीसिंह हे या किल्ल्याचे किल्लेदार होते बेनीसिंहांनी त्यावेळी अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचे मुंडके उडवत आपले प्राण त्यागले त्यावेळी युद्धाच्या हुतात्म्याची माहिती होताच गडावरील स्त्रिया यावेळी सती गेल्या अनेक पिढ्यांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेला या किल्ल्याचा गौरव कायम राहावा त्याची स्मृती सदैव इथल्या पिढीच्या स्मरणात राहावी या अनुषंगाने गेल्या चार वर्षापासून स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या उपक्रमाचे आयोजन करीत असते यंदा पाचव्या वर्षी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करून दहावी गाविलगड चा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश प्रतिष्ठानचा असल्याचे शिवा काळे यांनी यावेळी सांगितले या दोन दिवसीय कार्यक्रमात मंगळवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता पासून चिखलदरा तालुक्याची गाविलगड च्या पायथ्याशी असलेली बागलिंगा येथील संरक्षण चौकी पासून शेकडो तरुण बागलींगा संरक्षण चौकी ची स्वfच्छता करून किल्ल्याकडे प्रस्थान करतील गडाची चढाई पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजता गड भ्रमंती व भड अवलोकन करण्यात येईल सायंकाळी चर्चासत्र व पुढील नियोजन  केला जाईल बुधवार दिनांक 15 डिसेंबर रोजी चिखलदरा येथे पोलीस कवायत मैदानावर होईल तसेच  अकरा वाजता सादरीकरण होईल मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल शिवशक्ती आखाडा नागपूर येथील चमूनचे मर्दानी खेळ प्रात्यक्षिक वस्ताद हितेश डफ यांच्या मार्गदर्शनाखाली होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक मानकर हे असतील प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश भाऊ गुप्ता, बच्चूभाऊ कडू, सुनील भाऊ देशमुख राजकुमार पटेल राजेंद्र सिंह सोमवंशी अब्दुल भाई शेख अविनाश कोठाळे असणार आहे नोव्हेंबर 1803 मध्ये झालेल्या युद्धाच्या प्रसंगी आपल्या प्राणाचे बाजी लावणारे खोटे पाटील यांचे वंशज व तोफखाना प्रमुख करताजी जायले यांच्या वंशज या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे सोबत विविध विभागातील नामांकित व्यक्तींचे सत्कार येथे आयोजित केलेला आहे सोबतच मेळघाटातील जीवन पद्धतीवर अभ्यास करणारे या भागातील अभ्यासक डॉक्टर एकनाथ तट्टे यांना मेळघाटचे अरण्यपुरुष ही उपाधी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान तर्फे प्रदान करण्यात येत आहे

Previous Post Next Post