जुनापाणी येथील अंगणवाडी सेविका नियमबाह्य असल्याचा आरोप...


 जळगाव जामोद प्रतिनिधी:-                               

सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनापाणी येथील अंगणवाडी सेवा जेष्ठता वगळता नियुक्ती अर्थात बडती देण्यात आली की चुकीच्या पद्धतीने देण्यात आली असा आरोप सेवा जेष्ठता असलेल्या तीन महिलांनी केला आहे या महिलांनी सदर नियुक्ती संदर्भात तक्रार केली असता त्यांना नोटीसी द्वारे सात डिसेंबरला कार्यालयात बोलून धमकवण्यात आले व दम नटी करण्यात आली व कार्यालयात हाकलून दिले असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण यांनी केले असा आरोप सदर महिलांनी केला आहे आज जिल्हाधिकारी यांच्या नावे आमरण उपोषण पूर्व निवेदन द्वारा पंचायत समिती मार्फत दिले आहे त्याची प्रतिलिपी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा व माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय जळगाव जामोद व पोलीस स्टेशन कार्यालय जळगाव जामोद आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जळगाव जामोद यांना देण्यात आले निवेदनकर्त्या सविता पुंडलिक खवले प्रमिला रामेश्वर तायडे आम्रपाली विनोद अंदुरकर यांनी आज निवेदन देऊन सदर नियुक्ती रद्द न केल्यास 12 डिसेंबर पर्यंत जर नियुक्ती रद्द नाही झाली तर 13 डिसेंबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर या तिन्ही महिला आमरण उपोषणास बसणार आहेत

Previous Post Next Post