हिवरखेड नगरपरिषद करण्यासाठी कटिबद्ध... आमदार भारसाकळे..


प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड येथे नगरपंचायतिचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर असून नगरपंचायतीवर स्थगिती आली असतांना आमदार प्रकाश भारसाकळे यांना भेटलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आश्वासित करतांना आमदार भारसाकळे यांनी हिवरखेड नगरपरिषद किंवा नगरपंचायत जे मागणी गावकऱ्यांची असेल ती मागणी पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.गेल्या 23 वर्षांपासून हिवरखेड नगरपंचायत किंवा नगरपरिषद होण्याकरिता सतत प्रयत्न सुरू आहेत यासाठी हिवरखेड येथे अनेक आंदोलने, उपोषणे करण्यात आली तर  अनेक माजी सरपंचांनी पदावर असतांना देखील हिवरखेड नगरपंचायत किंवा नगरपरिषद होण्याकरिता ग्रामपंचायतिचे ठराव सुद्धा शासनाकडे पाठविलेले आहेत त्यांची फलश्रुती म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाकडून हिवरखेड नगरपंचायतिची प्राथमिक उद्घोषणा करण्यात आली मात्र त्यावर गावातील काही नागरिकांनी लेखी आक्षेप नोंदविल्यामुळे शासनाकडून परत स्थगिती देण्यात आली. आमदार भारसाकडे यांचे नगरपंचायत स्थगिती बाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायलर झाल्यामुळे येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळ तथा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या भेटीसाठी अकोट येथे गेले असता आमदार भारसाकळे यांनी उपस्तीती शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून हिवरखेड वासीयांना हवी असलेली नगपंचायत किंवा नगरपरिषद करण्यास कटिबद्ध असून त्यावर तात्काळ उचित कार्यवाही करणार असल्याची ग्वाही उपस्तीतासमोर दिली.निवेदन देतेवेळी संदिप इंगळे, सुलभाताई रमेश दुतोंडे, मनीष भुडके, किरण सेदानी, सादिकभाई,मिलिंद भोपळे, आनंद बोहरा, लालाभाऊ सेदानी, मुन्ना माधानी,श्यामशील भोपळे,राजुभाई चांडक, सुनील इंगळे, अनिलभाऊ कराळे, महेंद्र भोपळे, गणेश वानखडे, उमेश टापरे,विरेंद्र येऊल, मनोज राठी,सुनील बजाज,सुरज चौबे, जितेश करिया, धीरज बजाज, प्रदीप पाटील,जितेंद्र लाखोटीया,केशव कोरडे,अर्जुन खिरोडकर,शहजाद खान ,दिनू पटेल, अजीज खान, राजेंद्र टावरी, दीपक टावरी, विनोद धबाले, अंकुश निळे, एकनाथ भोपळे, संजय हिवराळे,रमेश दुतोंडे,संतोष शर्मा, रज्जाक भाइ , मो शफाकत, बाळासाहेब नेरकर, राजू खान,सतीश इंगळे, सुदाम राऊत, अंकुश हिवराळे,यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्तीती होते.

Previous Post Next Post