महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड जिल्हा अकोला संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बाजी मारत संपूर्ण जिल्ह्यात विद्यालयाचे नाव शिखरावर नेले आहे . जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांचे मार्फत सुरू असलेल्या स्पर्धातील सांघिक खेळामध्ये 17 वर्षाखालील क्रिकेट संघ, 19 वर्षाखालील मुलींचा वॉलीबॉल संघ तसेच 19 वर्षाखालील मुलांचा खो-खो संघ जिल्हास्तरावर विजयी होऊन विभाग स्तरावर अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने सुद्धा जिल्हास्तरावर धडक मारली आहे.इतर मैदानी स्पर्धांमध्ये 100 मीटर,300 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी ,थाळीफेक, भालाफेक ,इत्यादी स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी विजयश्री खेचून आणत जिल्हास्तरावर स्थान मिळविले आहे. जिल्हास्तरावर यश प्राप्त करून विभाग स्तरावर संपूर्ण अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व सहदेवराव भोपळे विद्यालयाचे विद्यार्थी करतील हा क्षण संपूर्ण तालुका व जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचे उद्गार संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे यांनी केले आहे.विद्यार्थ्यांनी अथक परीश्रम करून साध्य केलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे कार्यवाह श्यामशील भोपळे प्राचार्या कू वालोकार मॅडम,प्रभारी पर्यवेक्षक स्नेहल भोपळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक संतोष राऊत सर प्रशिक्षक अक्षय मोरखडे मार्गदर्शक लहाने सर, कासोटे सर तसेच सर्व शिक्षक वृंद व आपल्या पालकांना देतात.
भोपळे विद्यालयाचे तीन संघ विभागीय स्तरावर..।
प्रशांत भोपळे/हिवरखेड....
