बापुमीया सिराजोद्दीन पटेल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थाची विभाग स्तरावर निवड...



जळगाव जा.प्रतिनिधी:-

महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे यांच्या मार्फत आयोजित जिल्हा स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दी.3 डिसेंबर रोजी क्रीडा संकुल  बुलढाणा येथे संपन्न झाल्या. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये बापूमीया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी जाफर खान अय्युब खान याने 19 वर्ष या वयोगटात गोळा फेक या क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून विभागीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी याची निवड करण्यात आली.या यशाबद्दल विजयी खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. सलीमजी पटेल साहेबांनी अभिनंदन करून त्याला विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.त्याच बरोबर संस्थेचे सहसचिव श्री रब्बानी देशमुख, संचालक  प्रा. कय्युम पटेल, सिराजोद्दीन पटेल, प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी सुद्धा जाफर खान याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तसेच क्रीडा शिक्षक प्रा. जे. यु. कचवे यांचे खेळाडूला मार्गदर्शन मिळाले. बापुमिया सिराजोद्दीन पटेल शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा जाफर खान याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post