राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील भवई जंगलात एका व्यक्तीचा वय 30ते35 वर्षे कुजलेला मृतदेह आढळून आला. गुरुवारी ता. आठ ही घटना उघडकीस आली.चिखलदरा पोलीसानी घटनास्थळचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असे चिखलदरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल वाढवे यांनी सांगितले. सदर व्यक्ती जंगलात कसा आला. हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील पोलीस संदीप फुंदे, श्रीकांत खांदे, दिनेश तायडे, विनोद ईंसळ यांनी परिसरातील नागरिकांकडे त्याबाबत चौकशी सुरू केली होती. घात की अपघात यासंदर्भात संभ्रम कायम आहे.
