पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करून पत्रकारावरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवण्यात यावे व किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांचे मारफत मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस निरीक्षक जळगाव जामोद यांचे मारफत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना आज १७ आँगष्ट रोजी निवेदन देण्यात आले....याबाबत सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास 200 पत्रकारांनवर हल्ले झाले, किंवा त्यांना धमक्या शिविगाळ केल्या गेली, मात्र केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायद्याची भीतीच समाजकंटकांच्या मनात उरली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. अलिकडेच पाचोरा येथील संदिप महाजन या पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिवीगाळ केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडानी त्यांच्यावर हल्ला चढविला.. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे. असे असले तरी मारहाण करणाच्या गुंडांवर किंवा शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारावर जे हल्ले होतात त्यातील 75 टक्क्यांवर हल्ले हे राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकत्यांकडून होतात, हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेले आहे. मग असा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी एन सी दाखल करून हा विषय बंद करून टाकतात. असे प्रकार वारंवार सर्वत्र दिसून येत आहेत. हे थांबलं पाहिजे आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आल पाहिजे.आणि या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांचे मारफत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.निवेदन देते वेळी पत्रकार सागर झनके, संतोष कुलथे,गोपाल अवचार,संजय दांडगे,राजू वाढे,राजेश बाठे,लीयाकत खान,विनोद वानखडे,अनिल भगत,अमोल भगत,भिमराव पाटील, गणेश भड,नागेश भटकर,शिवदास सोनोने, राजकुमार भड,गजानन खिरोडकर,आदी पत्रकार हजर होते
पत्रकार सुरक्षा कायद्याची कठोर अंमलबजावणी करा;जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडेम मागणी...
जळगाव जा प्रतिनिधी:-