दिनांक 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सव्वापाच ते साडेपाच च्या दरम्यान जळगाव जामोद एसटी आगारातून उसरा चालठाना साठी शाळेच्या विद्यार्थ्यांना जाणे येण्यासाठी नियमित बस चालू असते परंतु ही बस सुनगाव मार्गे चालठाणा उसरा जात असल्यामुळे येथून सुनगाव जाणाऱ्याही विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते घरी लवकर जाण्याच्या उद्देशाने हे विद्यार्थी चालठाणा उसरा या बस मध्ये जात असल्याने दोन्ही गावचे विद्यार्थी मिळून हा आकडा 100 च्या ही वर जातो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बरेच वेळा जागेवरून किरकोळ वाद निर्माण होतात असाच वाद काल निर्माण झाल्याने चालठाणा व उसरा येथील विद्यार्थ्यांची बस चुकल्याने या विद्यार्थ्यांसमोर घरी जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे हे सर्व विद्यार्थी पोलीस स्टेशन येथे गेली असता त्यांनी त्यांची व्यथा पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्यासमोर मांडली तसेच काही विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सुनील बोदडे यांना गाडी निघून गेल्याने आम्हाला घरी जाण्यासाठी गाडी नाही आमची काहीतरी व्यवस्था करा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सुनील बोदडे यांनी व पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे व पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार यांनी बस स्थानकावर जाऊन विद्यार्थ्यांची सर्व परिस्थिती सांगितली असता सुनील बोदडे यांनी आगार प्रमुख यांना फोनवर संपर्क साधून विद्यार्थ्यांची बस चुकल्याने त्यांची घरी जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक सरकटे यांनी नियंत्रण कक्षात जाऊन विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांची जाण्याची व्यवस्था करा असे सांगितले असता नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सुद्धा सहकार्याची भावना म्हणून विद्यार्थ्यांसाठी लगेचच दुसऱ्या बसची व्यवस्था केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खुश होऊन वंचित बहुजन आघाडीचे सुनील बोदडे, पोलीस उपनिरीक्षक सरकटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेगोकार, आगार व्यवस्थापक, चालक वाहक व यांच्यासह पत्रकार अनिल भगत यांचे आभार मानले..
चालठाणा, उसरा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुनील बोदडे यांच्या तप्तरतेने घरी जाण्यासाठी मिळाली बस...
जळगांव जा.प्रतिनिधी:-