जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ही नेहमीच चर्चेत असते मागील पंचवार्षिक पाहता अपक्ष पाच व चार भाजपचे असे मिळून भाजपने सुनगाव ग्रामपंचायतवर सत्ता काबीज केली होती परंतु स्वतःच आपण विराजमान केलेल्या सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारित करून स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेतला होता व त्यानंतर त्याचाच फायदा घेत सूनगाव येथील शिवसेनेच्या विजयाताई पुंडलिक पाटील ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा सूनगाव ग्रामपंचायतीला पाहायला मिळाली आहे. सुनगाव ग्रामपंचायत ची निवडणूक 2021 झाली होती त्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी रंगत लढली होती सूनगाव ग्रामपंचायतचे एकूण 17 सदस्य या रिंगणात होते त्यामध्ये जनतेने समसमान म्हणजेच भाजपला आठ व महाविकास आघाडीला आठ आणि एक अपक्ष असे सदस्य निवडून दिले परंतु भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीमधील रामेश्वर अंबडकार ह्या सदस्याला पळवून त्याला सरपंच पदावर विराजमान केले व सूनगाव ग्रामपंचायत ही आपल्या ताब्यात घेतली परंतु ग्रामपंचायत कडून अडीच वर्षात कोणत्याच प्रकारे विकास होऊ शकला नाही. ग्रामपंचायत च्या सर्व कामांमध्ये सतत जिल्हा परिषद सदस्य पती हे ढवळाढवळ करीत असल्याने तसेच सुनगाव सरपंच रामेश्वर अंबडकार हे सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करीत नसल्याने व जनसामान्यांना सुख सुविधा देण्यास असमर्थ ठरली यासह गावातील विकास कामे ही एक ते दीड वर्षांपासून ठप्प पडलेली दिसत होती. जनतेची ही कोणतेच कामे होत नसल्याने यालाच कंटाळून भाजपचे पाच सदस्य व महाविकास आघाडीचे आठ सदस्य यांनी अविश्वास प्रस्तावात सहभागी होऊन सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या विरुद्ध 13 जणांच्या सह्या असलेला प्रस्ताव 17 आँगस्ट रोजी तहसीलदार जळगाव जामोद यांच्याकडे दाखल केला आहे. सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य पती ने आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन भरस्त्यात गोंधळासह धिंगाणा घातला होता.या अविश्वास प्रस्तावावर ग्रामपंचायत सदस्य गजानन गणपत दातीर, कौशल्या दिनेश ढगे,राहुल समाधान इंगळे, दीपिका रामसिंग राजपूत,देवा वानखडे,द्रोपदी पांडुरंग गवई, तोताराम निहाल, रामकली निहाल,विमल समाधान काळपांडे, सगिराबाई उमेद तडवी,नंदा रियाज तडवी, संतोष शत्रुघ्न वंडाळे, श्याम भुरा निहाल या सदस्यांच्या सह्या आहेत. यासाठी 23 आँगस्ट रोजी मतदान होणार आहे त्यामुळे सुनगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे.