रजत नगरीत साकार झाली 100 किलो चांदीची गणेश मूर्ती..खामगांवच्या चांदीची गणेशमूर्तीलाही चमक..जालन्यात स्थापन होणार चांदीची गणेशमूर्ती...


 सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

रजत नगरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे तब्बल एक क्विंटल वजनाची चांदीची गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे.. जालना जिल्ह्यात अनोखा गणेश मंडळाकडून या मूर्तीची मागणी करण्यात आली आहे... यंदाच्या गणपती उत्सवात जालना जिल्ह्यातून चांदीच्या गणपतीची विशेष अशी ऑर्डर खामगावच्या विश्वकर्मा सिल्वर हाऊस कडे प्राप्त झाली आहे... आलेल्या मागनीनुसार त्यांनीही तब्बल पाच महिने चांदीवर मेहनत घेत अशी ही आकर्षक, देखणी आणि विलोभनीय गणेश मूर्ती तयार केली आहे.. या मूर्तीला तब्बल 80 लाख रुपये खर्च आला असून जालना येथील अनोखा गणेश मंडळ यावर्षी ही या मूर्तीची स्थापना करणार आहे.

Previous Post Next Post