बोगस रस्ताकाम करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा......अन्यथा सोनाळा ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा...


अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...

संग्रामपुर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या सोनाळा ग्रामपंचायत च्या बेजबाबदार पणा मुळे अनेक ठिकाणी बोगस कामे होताना दिसत आहेत.यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी व लेखी निवेदने दिली आहेत.... परंतु नागरिकांच्या या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन हेतू पुरस्कारपणे दुर्लक्ष करीत असल्याने प्रतीक गावंडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन 19 सप्टेंबर रोजी देण्यात  आला.. ..यासंदर्भात काही तात्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सोनाला ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे..

Previous Post Next Post