डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हा संघटकपदी वासुदेव राजनकर,जिल्हा सदस्यपदी गणेश भड तर जळगाव जा तालुकाध्यक्ष पदी नागेश भटकर यांची नियुक्ती...


 जळगाव जामोद प्रतिनिधी :-

मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मिडीया परिषदेच्या जळगाव जा येथील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी जाहिर केल्यात.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांचे आदेशावरून राज्य कार्याध्यक्ष अनिलजी वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राज्य अध्यक्ष शरद पाबळे,  उपाध्यक्ष राजेंद्र काळे, विभागीय सचिव अमर राऊत,बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा कार्याध्यक्ष सतिषआप्पा दुडे यांच्या मार्गदर्शनात डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर  यांनी जळगाव जा येथील वासुदेव राजनकार यांची जिल्हा संघटक,गणेशराव भड जिल्हा सदस्य तसेच जळगाव जा तालुकाध्यक्ष पदी नागेश भटकर यांची नियुक्ती केली.यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा संघटक नारायण दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post Next Post