अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
हिवरखेड नजीक येत असलेल्या कार्ला बु येथे तंटामुक्ती पदाची निवड करण्यात आली, या निवड मध्ये तरुण ,युवा नेतृत्व म्हणून राम सपकाळ यांची निवड करण्यात आली, तरुणांनी समोर येऊन काही तरी मोठे सामाजिक कार्य घडवावे तसेच गावातील तंटे,वाद विवाद, अवैध धंद्याला आळा बसावा, तरुण पिढी बरीच दारूच्या अहारी चालली या अवैध दारूला आळा बसावा तरुणांनी क्रांतीच्या मशाली हाती घेऊन येणाऱ्या पिढी करिता नवचैतन्य घडवावे हाच उद्देश यांच्या निवडीतुन निष्पन्न होत आहे,यांच्या निवड वेळी गावकरी मंडळी उपस्थित होती, तर यांचे गावकऱ्यांच्या वतीने कौतुक सुद्धा होत आहे,
