वानखेड येथील ५ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू...


 अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे दोन दिवसापूर्वी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री घरात  शिरलेल्या विषारी सापाने झोपेत असलेल्या ५ वर्षीय बालकास दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली .वानखेड येथील आर्यन भगत हा 5 वर्षीय बालक  झोपलेला असताना विषारी सापाने दंश केला...  सदर मुलाच्या तोडून फेस येत असल्याने ही बाब पालकांच्या लक्षात आली.  त्यानंतर भगत कुटुंबीयांनी आर्यनला शेगाव येथील सईबाई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, आर्यनचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.आर्यनचे आई-वडिलांचे अत्यंत गरिबीची परिस्थिती असून असून हे कुटुंब मोल मजुरी करून त्यांचा उदार निर्वाह करते.. त्यांच्या लहान बालकास विषारी सापाने दंश केल्यामुळे त्यात त्याचा मृत्यू झाला असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Previous Post Next Post