आयटीआय जळगाव जामोद येथे पीएम स्किल रन (प्रधानमंत्री कौशल्य दौड)चे आयोजन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत 17 सप्टेंबर रोजी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते... भारत सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभागाअंतर्गत विश्वकर्मा जयंती दिनाचे औचित्य साधून पिएम रन फॉर स्किल हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.. त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जळगाव जामोद च्या अंतर्गत आयटीआय ते बस स्टँड चौक शा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन चे संचालक डॉ. श्री किशोरजी केला हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  व्ही एस पायघन, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ.श्री प्रवीण डाबरे  यांच्यासह स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मार्क मार्कंड साहेब इत्यादी अधिकाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश होता.. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष गटातून माधव सुभाष जमरा प्रथम, आनंद किसन इंगळे द्वितीय तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक  गणेश विष्णू लोणकर याने फटकाविले . तर  मुलींमधून प्रिया रामराव पांडे प्रथम, कीर्ती साहेबराव सरिसे द्वितीय तर तृतीय क्रमांक निकिता गौतम तायडे यांनी पटकाविला असून उपस्थित मान्यवरांच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र, पारितोषिक व रोख रक्कमेचे बक्षीस देण्यात आले..... स्पर्धा परीक्षक म्हणून क्रीडा शिक्षक रवींद्र खवणे, दीपक देशमुख, तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल व प्रतीक राऊत यांनी काम पाहिले..तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी प्रमोद दाभाडे,मोहन दाभाडे, राणे, ताडे , तानकर, सोनटक्के, आकोटकर मॅडम  , भामोद्रे यांनी मोलाचे सहकार्य दिले..

Previous Post Next Post