किडा -किटकुल चावल्यास दुर्लक्ष करू नये - डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो मृत्यू...


 सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

सध्या पावसाळ्याचे दिवस असुन शेतात काम करीत असताना शेतकरी व कामगार यांना किडा- - किटकुल आदी चावत असतात. याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना सेल्युलायटीस चा आजार होवू शकतो. या आजाराचे काही रुग्ण शहरात उपचारासाठी येत आहे. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रोज १ ते २ रुग्ण उपचारासाठी येत आहे. त्यामुळे किडा किटकुल चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच त्या ठिकाणी खाजवू नये व त्वरीत उपचार करावा असे आवाहन खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वानखडे यांनी केले आहे.

Previous Post Next Post