सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
खामगाव एकाच दिवशी काही तासांच्या अंतरात मृत्यूने दोघी मायलेकींना गाठून देवाघरी नेले. वरजितकौर लाभसिंग बग्गा (वय ७७) यांचे काळ गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने खामगाव शहरातील तलाव रोडवरील घरी निधन झाले तर त्यांची मुलगी कबलजितकौर टुटेजा (वय ६१) यांचा कालच इंदोर येथे हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. वरजितकौर बग्गा यांनी सकाळी १० वाजता प्राण सोडले, तत्पूर्वी त्यांच्या इंदोर येथे राहणान्या कन्या कवलजितकौर टुटेजा यांचे आज सकाळीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. एकाच दिवशी या दोघी मायलेकींचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बग्गा परिवारावर दुहेरी दुःख पसरले आहे. या दोघी मायलेकींवर आज शुक्रवारी एकाच वेळी खामगाव शहारातील ओंकारेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
---------------------
