जारीदा परीसरात जंगली प्राण्यांचा हैदोस..रान डुक्कराच्या हल्ल्यात आदिवासी युवक गभिंर रित्या जखमी...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

.कृषिप्रधान असणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये हल्लीच्या काळामध्ये  शेतकर्यांना अतिशय वाईट संकटाच्या सामना करावा लागत आहे. त्यामध्ये सध्याचा स्थितित अचानक आलेल्या परतिच्या पावसामुळे  या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र मेलघाट मध्ये  बहुतांश भागात  दिसत आहे.तर दूसरिकडे वन्यप्राणी यांनी शेतातील पिकावर हल्ला करून शेतकर्यांचे पिकाचे पण नुकसान केल्याचे दिसून येत आहे . अशीच घटना जारीदा व्याघ्र प्रकल्प बिट ३१८ या वन परीक्षेत्रातुन अचानक आलेल्या रानडुक्कराच्या कळपामुळे  बामादेही येथील आदिवासी युवक सुनील मोती बेठेकर,वय २८ वर्ष हा काही कामानिमित्त बाहेरगावी जात असतांना सकाळी ८ वाजता च्या दरम्यान  २० ते २५ रान डुक्कर अचानक रस्त्याचा मधोमध आल्यामुळे सदर युवकाचा तोल बिघडल्यामुळे  हा अपघात झाला.चुरणी ते जारीदा या रस्त्याचा मधोमध हा अपघात झाला आहे .हि घटना घड़ल्यावर याच रस्त्यावर शेत असलेले शेतकरी रुनु जामुनकर  यांनी रुग्णवाहिका १०८ याला माहिती देऊन घटनास्थळ येथे बोलावली व ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे हालवण्यात आले .हा युवक गंभीररुपे जख्मी होता .उपचारा दरम्यान या युवकाला सहा टाके लागले .सुनील हा गंभीररुपे जख्मी असल्यामुळे प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालय अमरावती येथे सिटीस्कैन व पुढील उपचारा करीता पाठविण्यात आले अशी माहिती ग्रामीण रुग्णालय चुरणी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वपील मेसरे यांनी दिली . याच सोबत या रान डुक्कर यांचा कळपाने तेथील शेत असलेले विनोद नामदेव अलोकार या गरीब शेतकर्याचे हाततोंडाशी आलेल्या ज्वारी,मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान  केले असल्याचे समजले जात आहे .सिपना वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाच्या बिट ३१८ या वन्यजीव परिसरात या रानडुक्कर यांचा व इतर प्राण्यांचा वावर असल्यामुळे जवळील शेतकर्यांचा खुप नुकसान होत आहे. शेवटी "गवे गेले आणी डुक्करे आली" अशी म्हणण्याची वेळ शेतकरी यांचावर आलेली आहे .या मुळे विनोद नामदेव अलोकार या शेतकर्याचे डुक्कराच्या धुमाकुळ मोठ्या प्रमाणे नुकसान झाला आहे .झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी व या डुक्करांच्या वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांची जोर धरत आहे.

Previous Post Next Post