जळगाव शहरातील विविध समस्यांनी ग्रामस्थ हैराण तर लोकप्रतिनिधी मुंग खाऊन गुंग डोकेदुखी:- गटारीचे; अळ्या, दुर्गंधीने नागरिकाना वैताग आणि मुख्याधिकारी यांचा दुर्लक्षित कारभार तर साफ सफाई ठेकेदार बिल काढण्यात व्यस्त.वायली वेस झोपाडपट्टीत स्मशान रोड किनारी गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने गाळ व कचऱ्याने त्या तुंबल्या आहेत. सांडपाण्याचा निचरा होईना, गटारी तुंबल्याने डास वाढले; साथरोगांचा फैलाव होण्याची धास्ती नागरिका मध्ये वाढली आहे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ते थेट रस्त्यावर येऊ लागले आहे. सातत्याने पाणी साचल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. परिणामी साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता बळावली. दुर्गंधीचाही सामना करावा लागतो आहे. यामुळे डेंग्यू, चिकनगुण्या, मलेरिया, कावीळ, विषमज्वर (टायफॉईड), हगवण-जुलाब, फ्ल्यू ताप, गोवर, गालगुंड, मेंदुज्वर, लेप्टो, डोळे येणे, घसासूज, कांजिण्या या सारख्या आजार साथीला आमंत्रण देण्याचे काम मुख्याधिकारी यांच्या दुरालक्षित कारभाराने होत आहे.गावातील बऱ्याच ठिकाणी गटारी पुर्ण गाळाने भरल्याने गटारीचे पाणी वाहायला जागा नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.या आधीही गंभीर प्रकारे आजार येथील ग्रामस्थांना उद्भवलेले आहे. त्यामुळे गावातील लहान सहान क्लिनीक पेशंटने फुल्ल भरलेले असातात.याबाबत तक्रार करायची तरी कोणाकडे कारण लोकप्रतिनिधी महाशय तर आठवड्यातुन 1 किंवा 2 दिवस गावात येतात. तर इतरांचा विचारच न केलेला बरा हे सगळं होतं असतांनाही गावात काहीही समस्या नसल्याच्या आविर्भावात वागतात गटारीचे अळ्या, दुर्गंधीने नागरिक सकाळी उठल्याबरोबर स्वत: साफ करतात ग्रामस्थ वैतागाला सामोरे जात आहेत.
काय ते गाव, काय त्या गावच्या तुडुंब गटारी काय ती अस्वच्छता. आणी काय ते पाण्याचे हाल मुख्याधिकारी मात्र एकदम ओके मध्ये हाय..
अशोक टाकळकर/जळगांव जा प्रतिनिधी...
