बुलडाणा लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचाच खासदार हवा. शरद चेके पाटील..


अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...

बुलडाणा लोकसभेसाठी अनेक वर्षे पासुन शिवसेना भाजप युतीत शिवसेना यांना लोकसभेसाठी जागा दिली पण अनेसर्गिक युत्या आघाड्या पाहता ही जागा भारतीय जनता पार्टीलाच सुटायला हवी अशी अनेक वरशापासूनची इच्छा भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्ते यांची आहे. यामध्ये आमदार. महाले ताई आमदार संजुभाऊ कुटे याच बरोबर सदैव शेतकऱ्याचे हित जोपासणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयसेवक योगेंद्रजी गोडे साहेब यांचे ही नाव चर्चेत आहे. यापैकी उमेदवार कोणीही असो पण बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा भाजपलाच सुटावा अशी सर्वसामांन्य कार्यकर्त्याची इच्छा आहे.अशी मतदार संघात चर्चा आहे.याचप्रमाणे योगेंद्र गोडे सर्व समावेशक नेतृत्व आहे अनेक सामाजिक अध्यात्मिक उपक्रम त्यांनी राबविले आहे जील्हा बॅकच्या नावावर राजकारण करणारे काही स्वयम घोषित उमेदवार यांनी आंदोलने करून जनतेची दिशाभूल केली नाही. पण गोडे साहेबांनी कायदेशीर लढा देवुन विशेष प्रयत्न केले. शेतकरी वाचला तर देश टिकेल यासाठी त्यांनी शेतकरी यांना वेगवेगळ्या उमक्रम राबवून त्यांनी त्यांना स्वत हा मदत केली मग खत बियाणे वाटप असेल किंवा कोणतीही समस्या निवरण्याचे काम त्यांनी केले. शेतकऱ्याच्या नावावर त्यांनी कधीही राजकारण केले नाही बुलडाणा मतदार  सघात त्यांची ताकत पण त्यांनी अपक्ष उभे राहून दाखवुन दिली. याच बरोबर चिखलीच्या आमदार महाले ताई या ही विकास कन्या म्हणुन प्रसिद्ध आहे.त्याही महिला आमदार म्हणुन त्यांच्या नावाची चर्चा  जोरात आहे. आणि आमदार संजय कुटे हे ही कर्मयोद्धा म्हणुन ओळखल्या जातात मग हा मतदार संघ लोकसभेसाठी भाजपाला का नको एवढी प्रचंड भाजपची ताकत असताना हा मतदार संघ भाजपलाच सोडावा अशी अपेक्षा सर्व सामान्य कार्यकर्ते करत आहे.

Previous Post Next Post