जळगाव जामोद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया फ्रंट ची बैठक संपन्न..।


जळगांव जा.प्रतिनिधी:-

दि.24-09-2023 रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया ची बैठक नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष निजाम राज यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. प्रसेनजितदादा पाटील यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती, आगामी काळात पक्षबळकटी साठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणे, मा. शरदचंद्र पवार साहेब तसेच पक्षाचे विचार सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवणे या विषयी मा. प्रसेनजित दादा यांनी आपले विचार व्यक्त  केले, सदर बैठकीला अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष एम. डी. साबीर, तालुका कार्याध्यक्ष महादेवजी भालतडक,ऍड. मोहसीन खान,इरफान खान ( शेट्टी भाई ),आशिष वायझोडे, विठ्ठल घुले,मंगेश वाघ,आदित्य पाटील, पंजाब वाघ, भागवत अवचार, आकाश जाणे, योगेश वाघ, सिद्धार्थ हेलोडे, निखिल पाथरीकर, विशाल वाघ, ताहेर मारी भाई, आकाश जाणे, आकाश पाटील, भूषण चौधरी, अमोल पाटिल, रोहित पवार, खालिद माहि, मयूर तायडे, मोईन राज यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकार्यांची उपस्थिती होती.यावेळी नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष निजाम राज यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Previous Post Next Post