वंचित बहुजन आघाडीच्या वतिने सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार...


 बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी:-

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आद.अंजलीताई आंबेडकर व आद.महेश भारतीय यांच्या आदेशानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हा पदाधिकारी यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. नवनिर्वाचित सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 24 सप्टेंबर रोजी स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झाली, या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलन हे संघटक व भुमिका प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत कसे घेऊन जायचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कसे काम करायचे या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले व वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा शहर अध्यक्ष मिलिंदभाऊ वानखडे यांनी सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शक केले.सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलडाणा जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, जि.उपाध्यक्ष सिद्धार्थ शिरसाट, जि.सचिव अजय घुगे , राज वानखडे , जि.महासचिव रोहन पहुरकर यांचा सत्कार  वंचित बहुजन आघाडी बुलडाणा शहर अध्यक्ष मिंलीदभाऊ वानखडे यांचा वतीने करण्यात आला. यावेळी वंचितचे शहर महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत, उपाध्यक्ष गजानन गवई, प्रविण खरात, गिरीश उमाळे ,सुमित सावंग  व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते...

Previous Post Next Post