मोरया गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य शिबिर संपन्न... शिबिरात शेकडो रुग्णांनी घेतले लाभ..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्थानिक जळगाव जामोद शहरातील मोरया गणेश उत्सव मंडळाने संकल्प यात्रा काळजी जनतेच्या आरोग्याची आरोग्य सेवा रुग्णांच्या दारी या संकल्पनेतून मोरया गणेशोत्सव मंडळाने आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिर घेऊन सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. शहरामध्ये वाढत असलेली हाडांच्या रुग्णांची संख्या यामुळे सर्वसामान्य व्यक्ती खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेऊ शकत नसल्यामुळे मोरया गणेशोत्सव मंडळ व शिरेकर हॉस्पिटल द्वारा आयोजित मोफत तपासणी शिबिरामध्ये शेकडो अस्थिरोग रुग्णांनी तपासणी करून घेत उपचाराचा लाभ घेतला. यावेळी मोरया गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंद सपकाळ यांनी डॉक्टर सतीश शिरेकार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी मोरया गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी रुग्णांना तपासून त्यांना आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रुग्णांनी सहभाग नोंदवला.

Previous Post Next Post