जळगांव जामोद तालुका महाविकास आघाडी, समविचारी पक्ष व मराठा समाजाच्या वतीने वतीने जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ५.३०वाजे पासून वाहतुक व्यवस्था ठप्प करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता पोलिस बळाचा वापर करुन जळगांव जामोद येथे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल,कॉग्रेस नेत्या स्वातिताई वाकेकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन वाघ, , कॉग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, डॉ. संदिप वाकेकर,समाधान दामधर, भिमराव पाटिल, रमेश ताड़े, संजुबाप्पु देशमुख, अर्जुन घोलप, पराग अवचार, महादेव भालतडक, आशिष वायझोडे, ईरफान खान, दत्ता डिवरे, सिद्धू हेलोडे, अक्षय भालतडक, प्रकाश भीसे, मंगल डोंगरदिवे, वैभव जाणे यांच्यासह शेकड़ो पदाधिकारी व कार्यकर्त्याना अटक करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील खांडवी, जामोद, भेंडवळ, मड़ाखेड आणि जळगांव जामोद शहरात सुद्धा मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करित जळगांव शहर बंद करण्यात आले. गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानेच मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी केला. आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांसाठी समाजा सोबत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे जळगाव जामोद तालुक्यात सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको...
जळगांव जा.प्रतिनिधी:-