अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज विरोधात अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव येथे सकल मराठा समाजातर्फे कडकडीत बंदचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी शांततामय मार्गाने गावातून मोर्चा काढून मराठा आरक्षणाची मागणी करीत निर्दोष आंदोलकांवर अत्याचार करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी या हल्ल्या विरोधात घोषणाबाजी करून शासनाला जागे करण्यासाठी हिवरखेड येथील सकल मराठा समाज बांधवांनी महत्त्वाची भूमिका बजावली.