दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी माननीय विभागीय कृषी सह संचालक अमरावती विभाग अमरावती किसनराव मुळे साहेब यांनी कारंजा तालुका येथे भेट दिली यावेळी त्यांनी बेंबळा धोतरा गायवळ सोहळ कारंजा येथील येलो मोजाक, कोलार रॉट, चारकोल रॉट इत्यादी रोगाने ग्रस्त सोयाबीन पिकाच्या प्लॉटची पाहणी केली. बेंबळा येथील उल्हास ठाकरे यांच्या शेतामधील सोयाबीन पिकाची पाहणी केली तसेच गावकरी मंडळी सोबत या पिकाबद्दल आणि येलो मोझॅक या रोगाबद्दल चर्चा केली आणि सर्व उपस्थित शेतकरी मंडळींचे शंका समाधान केले. तसेच गायवळ येथे सरपंच सतीश पाटील सरपंच यांचे सोबत सोयाबीन पिकाची पाहणी करून उपस्थित शेतकरी मंडळी सोबत चर्चा केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे मंडळ कृषी अधिकारी अतुल क्षीरसागर, गुणवंत ढोकणे, कृषी पर्यवेक्षक उपाध्ये, भगत, कृषी सहायक वानखडे, कृषी सहायक राठोड, चंदन राठोड, प्रवीण जटाळे तसेच सर्व शेतकरी मंडळी हजर होते.
विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती यांची कारंजा तालुक्याला भेट...
विश्वास कुटे/वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-
