बँकेत जाणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीचा हात पकडल्याने. तरुणा विरोधात जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...


 जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपळगाव काळे येथे 29 वर्षीय तरुणाने गावातीलच इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी चा हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी त्याला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन.. इयत्ता नववी मध्ये शिकत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी तिचे सेंट्रल बँकेचे बंद पासबुक सुरू करण्याकरिता सेंट्रल बँक पिंपळगाव काळे येथे गेली असता त्या ठिकाणी तिने पैसे भरण्याची पावती भरली व ती बँकेच्या बाहेर निघाली त्या ठिकाणी आरोपी सुरेश गजानन बांगर यांनी त्या ठिकाणी जाऊन पीडित विद्यार्थिनीचा हात पकडून छेडखानी केली यावेळी तेथील काही नागरिकांनी आरोपी सुरेश बांगर याला पकडून ठेवले व घटनास्थळावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी सुरेश बांगर याला अटक केली पीडीतीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात पोलीस स्टेशनला अप नंबर 468/2023 कलम 354,354 (अ)यासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 व बालकाचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश बांगर यास पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत.

Previous Post Next Post