सायखेडा ते मानोली मुख्य रस्त्यावर सायखेडा गावानजिक अडान नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या कडेला दरड पडल्याने,भविष्यात मोठा अपघात होऊन वाहन नदी पात्रात कोसळून भीषण अपघात रोखण्यासाठी संबधीत विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.सायखेडा ते मानोली हा रस्ता मुख्य बाजारपेठेला म्हणजे मंगरूळपिर शहराला जोडला जाणार मुख्य रस्ता असल्याने परिसरातील दररोज हजारो वाहने या मार्गाने प्रवास करीत असतात, मात्र या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असुन प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, एवढेच नव्हे तर सायखेडा गावाजवळ अडान नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या कडेला मोठी दरड पडल्याने तेथे रस्ता अरुंद झाला आहे, त्या अरुंद रस्त्याने समोरून येणाऱ्या वाहनामुळे जाणाऱ्या वाहनाने बाजू घेतल्यास वाहन नदी पात्रात पडणार असल्याची दाट शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली आहे, हा अपघात रात्रीच्या अंधारात होण्याची शक्यता असल्याने अपघात रोखण्यासाठी संबधित विभागाने लक्ष द्यावे आणि होणारी जिवित्वहानी टाळावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला जबाबदार असल्याचे मत सायखेडा परिसरातील मोतसावंगा, रामगाव, येथील प्रवाशांनी केली आहे.
सायखेडा ते मानोली रस्त्यावरील पुल धोकादायक भिषण अपघाताची शक्यता...
विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...
