अकोट शहरातील प्रभाग सात मध्ये पोलीस चौकीची मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख मनीष कराळे यांनी दिले पोस्टेला निवेदन...


 सय्यद शकिल/अकोट...

अकोट शहरातील अतिसंवेदनशील परिसर हनुमान नगर व नवगाजी प्लॉट सीमेवर पोलीस चौकीच्या मागणीसाठी दिनांक 26 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक युवासेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख मनीष कराळे यांनी सर्वपक्षीय स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांसमवेत दिले अकोट शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले.अकोट शहरात सर्व जाती धर्माच्या लोकवस्त्या असून सदर शहर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून सर्वत्र परिचित आहे.शहराचा इतिहास व अलीकडच्या काळाचा विचार केला असता असे लक्षात येईल की,शहरात अनेकवेळी लहान सहान कारणांमुळे जातीय दंगलीची परिस्थिती निर्माण होऊन दोन्ही समाजात नाहक तेढ निर्माण होत असते ज्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होऊन जनजीवन विस्कळीत होते.अकोट शहरातील अति संवेदनशील असणारा भाग म्हणजे नवगाजी प्लॉट,हनुमान नगर,श्रीराम नगर हे आहेत.सदर परिसरातुन अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनिंना शैक्षणिक कामकाज निमित्ताने शहरात दैनंदिन ये जा करावे लागते परंतु काही वर्षापासून असे निर्दशनात आले आहे की,संबधित विद्यार्थीनी व परिसरातील महिलांना काही रिकामटेकड्या युवकांकडून विविध प्रकारचा नाहक त्रास देण्यात येतो.तसेच सदर परिसरात अनेक धार्मिक कार्यक्रम असतांना लहान मोठ्या जातीय भानगडी ह्या सातत्याने घडत राहतात.याव्यतिरिक्त सदर परिसरातील परिस्थितीचा एकंदरीत विचार केला असता या परिसरात शांतता व सुव्यवस्था नांदावी अनुषंगाने अनेकवेळा सुजाण नागरिकांनी या परिसरात पोलीस चौकी व्हावी यासाठी प्रशासनास मौखिक स्वरूपात मागणी केलेली आहे पण त्या मागणीला अद्याप यश आलेले नाही.सदर तिन्ही नगर हे प्रभाग क्रमांक ७ या प्रभागात येत असून परिसरात व परिणामी संपूर्ण शहरात शांतता नांदावी यासाठी आज सर्वपक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधींनी जो पुढाकार घेतला व मा.ठाणेदार साहेब यांच्यासोबत परिस्थितीबाबत संबधित विषयांवर सखोल चर्चा केली त्यानुसार लवकरच पोलीस चौकी देण्यात येईल अशा आशावाद आहे.यावेळी स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक अफजल खान आसिफ,जयदीप चऱ्हाटे,विजू भाऊ चंदन,राजू भाऊ ढोले,गणेशराव पानझडे,राजाभाऊ चंदन,ज्ञानेश्वर कोरपडे,प्रणव चोरे शहरप्रमुख युवासेना,राहुल नारे शहर संघटक, राहुल माकोडे उपशहर प्रमुख युवासेना,मनीष पटेल उपशहर प्रमुख,आंनद शिवरकार,पवन पांडे,मयूर बरबरे,पवन वानखडे,गोपाल सावके ,मुन्ना वानखडे,सैय्यद जमीद सैय्यद कासीम,मोहम्मद दानिश मोहम्मद नासिर,नजाकत खान नाझिम खान,वसीमखान अकबर खान इत्यादी सह अनेक प्रभाग ७ मधील अनेक जबाबदार प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post