भावना पब्लिक स्कूल देवगाव रिसोड येथील नामांकित शाळेतील प्रकार मेळघाट मधील आदिवासीं मुलींना प्रकल्प कार्यालयामार्फत देवगाव फाटा रिसोड येथील नामांकित शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या मुलींना स्थानिक शाळा प्रशासनाने मारझोड करून शाळेतून काढून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी यांचे मार्फत मेळघाट मधील आदिवासीं मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून शासकीय तसेच निमशासकीय नामांकित शाळेमध्ये प्रवेश दिल्या जाते. व व विद्यार्थी नुसार प्रकल्प कार्यालय त्या शाळांना अनुदान देते.त्यानुसार मेळघाट मधील चिखलदरा व धारनी तालुक्यांतील आदिवासीं मुलींना भावना पब्लिक स्कूल देवगाव फाटा रिसोड येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेत होत्या. त्याठिकाणी त्यांना नियमित जेवण मिळत नसल्याने त्यांनी शाळा प्रशासनाला तशी मागणी केली. भाजी ऐवजी त्यांना चटणी खावी लागत होती म्हणून त्यांनी चटणी खाण्यास विरोध केला म्हणून शाळेतील कल्पणाताई नामक शिक्षिकेने मुलींना मारझोड केली असल्याची माहिती मुलींनी दीली. व त्यांना तात्काळ एका शिक्षकाने गाडीत प्रकल्प कार्यालय धारणी येथे आणले. सदर मुली चिखलदरा ताुक्यातील रजनिकुंड माखला आवागड, व धारनी तालुक्यांतील नागझिरा शिरपूर येथील मुलींचा समावेश आहे.
मेळघाट मधील आदिवासीं मुलींना मारहाण करून शाळेतून काढले...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
