सुटाळा व चिखली येथे अवैध रित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना पकडले..खामगाव डीवायएसपी पथकाची कारवाई 77 हजार रुपयांचा माल जप्त...


 सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा/ खामगाव येथील डी.वाय.एस.पी पथकाने सुटाळा व चिखली येथे छापा टाकून अवैध रित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्या 2 आरोपी पकडले असून त्यांच्या जवळून देशी विदेशी दारू सह 77 हजार रुपयांचा माल जप्त केला असल्याची घटना दि 1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी घडली..खामगाव येथील शिवाजीनगर पोस्टे हद्दीतील असलेल्या सुटाळा व जलंब पो.स्टे अंतर्गत येत असलेल्या चिखली येथे खामगाव येथील डी वाय एस पी पथकाने छापा टाकून सुटाळा बुद्रुक येथील श्रीकृष्ण नगर मधील एका राहत्या घरामध्ये अवैध रित्या  विदेशी  दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या  रमेश लाससीग मोरे याला पकडून त्याच्या जवळून 71,160 रुपयाचा माल जप्त केला. तर जलंब पो.स्टे अंतर्गत येणाऱ्या चिखली येथील पुनम धाब्याजवळ अवैध रित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या हरिचंद्र विष्णू किरडे वय 48 वर्ष याला रंगेहात पकडले असून त्यांच्या जवळून 5 हजार 740 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या पथकातील पीएसआय मनोज वासाडे,पो.हे.का सुधाकर थोरात, पो.का विशाल कोळी, पो.का पूजा कडाळे यांनी केली आहे..

Previous Post Next Post