फरार झालेल्या आरोपीला जळगाव पोलिसांनी केले जेरबंद...


 गणेश भड/उपसंपादकRC24न्युज...

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सुनगाव येथे बकरी,म्हैस,बैल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस ग्राम रुधाना येथे जेरबंद करण्यास पोलिसाना  दि 10 ऑक्टोबरला यश आले.सूनगाव येथिल रहिवासी दिनेश ढगे यांचा सूनगाव शेजारीच मळा असून त्यात जनावरे बांधण्याचा गोठा आहे यामध्ये त्यांची जनावरे बांधलेले असतात दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी आपले जनावरे बांधून घरी निघून गेले व परत 8 वाजताच्या सुमारास मळ्यात आले असता त्यांच्या गोठ्यातील टीनपत्रे त्यांना काढलेली दिसली व ते आत गेले असता त्यांची एक बकरी त्यांना दिसली नाही व म्हैस व बैल यांचा दोर कापलेल्या अवस्थेत त्यांना आढळला त्यांनी इतरत्र शोध घेतला असता जळगाव रोडवर मालसिंग प्रेमसिंग डुडवा हा त्यांची बकरी घेऊन त्यांना जाताना त्यांना दिसला त्यांनी आवाज दिला असता तो बकरी सोडून पळून गेला अशी तक्रार त्यांनी जळगाव जामोद पोलिसात दिली आहे सदर घटनेचा तपास सुनगाव बीट जमदार इरफान शेख यांनी करत तपास चक्र फिरवत सदर आरोपीचा शोध घेतला सदर आरोपी कुटुंबासह मडाखेड येथे एका शेतात राहत होता कुटुंबासह आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना पोलीस नाईक इरफान शेख यांनी मोठ्या शिताफिने सदर आरोपीला जेरबद केले आहे यावेळी पो कॉ निलेश पुंडे, भागवत उंबरहंडे, सचिन राजपूत, पो कॉ कळस्कर, पो कॉ शेख याकूब यांनी सहकार्य केले

Previous Post Next Post