जउडका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एरंडा येथे भरवस्तीत मंदिरासमोर शेतीच्या वादातून एरंडा येथील मृतक गजानन उत्तम सपाटे वय ४५ वर्षे याला लोखंडी रॉडने डोक्यात मारून जीवाने मारल्याची घटना दिनांक 11- 10 -2023 चे सायंकाळी साडेआठ वाजताची दरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार यातील फिर्यादी नामे शिवाजी उत्तम सपाटे व 41 वर्ष राहणार एरंडा यांनी जवळका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की मला एक मोठा भाऊ नामे मृतक गजानन उत्तम सपाटे असून आम्ही दोघे वेगळे राहतो तसेच गजानन हा आई-वडिलांसह राहतो भाऊ गजानन हा वडिलांना सांभाळत असल्याने वडिलांचे नावावर कारली शेत शिवारात असलेली गट क्रमांक 314 असलेली 14 एकर 23 गुंठे भाऊ गजानन वाहतात त्या जमिनीचा कारली येथील नारायण सखाराम डुकरे, मधुकर सखाराम डुकरे ,किसन सखाराम डुकरे, नर्मदाबाई सखाराम डुकरे ,यांचे सोबत दिवाणी स्वरूपाचा वाद कोर्टात सुरू आहे दिनांक 11 _10 -2023 रोजी संध्याकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान माझा मोठा भाऊ नामे गजानन सपाटे यांनी कारली शेत शिवारातील सोयाबीन सांगून काढून आणली होती त्या सोयाबीनचे कट्टे आमच्या गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ठेवलेली असल्याचे मला समजल्याने मी ते सोयाबीन पाहण्याकरता जात असताना माझे पाठीमागे वहिनी नामे चित्रा गजानन सपाटे या सुद्धा आल्या होत्या त्यावेळी कारली येथील नारायण डुकरे ,मधुकर डुकरे, किसन डुकरे, विठ्ठल तातेराव वाघ ,गजानन वाघ ,नर्मदा डुकरे, सुरवता डुकरे, ज्योती डुकरे, चंदा नारायण डुकरे ,हे मंदिराच्या बाजूला असलेल्या ओट्यावर होते त्यांच्या बाजूला रस्त्यावर एक छोटा हत्ती वाहन उभा होता ,त्यांच्यापैकी नारायण डुकरे यांच्या हातात लोखंडी रोड होता त्या लोखंडी रोडने नारायण डुकरे हा फिर्यादीचा भाऊ गजानन याला महाराणा करीत होता त्याच्याजवळच उभा असलेला मधुकर डुकरे व किसन डुकरे यांच्या हातात काठ्या होत्या ते सुद्धा गजानन ला मारहाण करीत होते , त्यांच्यासोबत असलेले विठ्ठल वाघ गजानन वाघ यांनी गजानन सपाटे पकडून ठेवले होते तसेच नर्मदा डुकरे, सुरवता डुकरे, ज्योती डुकरे व चंदा डुकरे यांनी सुद्धा गजानन सपाटे ला मारहाण करीत होत्या व शिवीगाळ करीत होत्या, त्याचवेळी मी आवाज करत त्यांच्याकडे गेलो असता गजानन डुकरे हा लोखंडी रोड घेऊन माझ्या अंगावर आला त्याच वेळी मी बाजूला गेलो त्यांनी माझा भाऊ गजानन ला मारहाण केल्यामुळे तो म हनुमान मंदिराच्या ओट्यावर पडला होता त्याच्या डोक्यातून रक्त निघत होते त्याच वेळी नारायण डुकरे, मधुकर डुकरे ,किसन डुकरे, विठ्ठल वाघ, गजानन वाघ, ,नर्मदा डुकरे ,, सुरवता डुकरे ,ज्योती डुकरे ,चंदा डुकरे हे आपल्या वाहनाने गाडी क्रमांक एम एच 37 टी 16 70 वाहनाने पळून जात असताना त्यांच्यापैकी एका आरोपीचा मोबाईल तिथेच पडला होता तरी माझा मोठा भाऊ गजानन उत्तम सपाटे यांच्याकडे कारली असलेल्या शेत जमिनीचा वाद यांच्यासोबत चालू होता त्यामुळे यातील नमूद आरोपींनी मारहाण करून मृत्यू गजानन सपाटे यास जीवाने ठार मारले अशा फिर्यादीच्या फिर्यादी रिपोर्ट वरून नारायण डुकरे, मधुकर डुकरे ,किसन डुकरे ,विठ्ठल वाघ, गजानन वाघ, नर्मदा डुकरे, सुर्वता डुकरे ,ज्योती डुकरे ,चंदा डुकरे, यांच्यावर जऊलका पोलिसांनी कलम 302,143,147,148,504 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास जवुळका पोलिस करीत आहेत.
शेतीच्या वादातून एरंडा येथे शेतकऱ्याची हत्या...
विश्वास कुटे वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
