बुलढाणा तालुक्यातील मलकापूर ते नांदुरा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दि. २/१०/२०२३ ला सकाळी 5.30 वाजता घडली घटना मोरगड तालुका चिखलदरा येथील १० मजुर रस्त्यावर काम करण्यासाठी नांदुरा येथे गेले होते महामार्गाच्या बाजूला झोपडीत झोपले असतांना सकाळी ५.३० वाजता PB-11/CZ 4047 या आयशर वाहनांच्या चालकाने बेतरकार पणे गाडी चालवित वडणेर भुलजी MH-6 गावाजवळ मजुरांच्या झोपडीवर गाडी चालवित अपघात घडवला या अपघातात झोपडीत झोपलेले१)प्रकाश बाबु धान्डेंकर २६ वर्ष २) पंकज तुळशीराम जांभेकर १८ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. तर ३) अभिषेक रमेश जांभेकर १८ वर्ष व ४) दिपक पंजी बेलसरे २५ वर्षे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.५)राजाराम दादु जांभेकर ३५ वर्ष यांचेवर मलकापूर येथे शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.याच अपघात मध्ये झारखंड चे एक मयत तर पाच जण घायल आहे..मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल माजी आमदार केवलराम काळे तसेच टेबुरसोंडा जिल्हा परिषद सर्कल चे माजी समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी बुलढाणा येथे सम्पर्क करून माहिती जाणून घेतली अपघात ग्रस्तांना मदत कार्य सुरू
चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथिल चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू..तर एक जखमी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
