विश्वास कुटे वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाला जिवंत जाळल्याची घटना जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोल्हि नाजिक उघडकीस आली आहे.बोरगाव जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनुने वय 52 वर्ष यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना आज 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 च्या दरम्यान उघडकीस आली आहे. दिलीप सोनुने हे मालेगाववरून त्यांच्या बोरगाव जिल्हा परिषद शाळेत MH 37 y 1438 ड्रीम युगा दुचाकी जात असताना याचदरम्यान कोल्ही शिवारात दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दिलीप सोनुने यांना अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.अचानक झालेल्या हल्ल्यात सानुने जखमी झाले. यानंतर आरोपींनी दिलीप सोनुने यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. दिलीप सोनुने यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याआधीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या हत्येचा तपास जऊळका पोलीस करत आहेत. वृत लीहेपर्यंत अद्याप गुन्ह्याची नोद झाली नाही.