केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर मध्ये स्नेहसंमेलन संपन्न..संस्थापक अध्यक्ष भाईजींच्या वाढदिवसानिमित्त स्नेहसंमेलनाचे आयोजन...


जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 2 ऑक्टोबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते... 2 ऑक्टोबरलाच  बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजींचा वाढदिवस असतो त्याच अनुषंगाने शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते... विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेल्या शिक्षण  चळवळीच्या माध्यमातून सहकार विद्या मंदिर ची स्थापना करण्यात आली आहे.. त्याच अनुषंगाने दरवर्षी शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना दिली जाते... या स्नेहसंमेलनामध्ये इयत्ता नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक नृत्य तसेच फॅन्सी ड्रेस च्या माध्यमातून विविध कलाविष्कार सादर केले...   तर इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले माऊली माऊली व मंगळागौर हे समुह नृत्य या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले कावड नृत्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे यावेळी दिसून आले....केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर चे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम श्री गणेश व सरस्वती पूजन करण्यात आले... त्याचसोबत राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले... याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तपुस्तिकेचे सुद्धा विमोचन करण्यात आले... महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद केंद्र जळगावच्या अध्यक्ष तथा शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. स्वाती केला यांचा - केल्याने देशाटन हा लेख महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शिक्षण संक्रमण या मासिकामध्ये प्रसिद्ध झाला त्यामुळे  त्यांचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या वतीने शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. त्यासोबत बुलढाणा अर्बन व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने भाइजींच्या वाढदिवसानिमित्त  फिरत्या नेत्र चिकित्सालयासाठी संस्थेकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या वतीने फीत कापून लोकार्पण करण्यात आले तसेच बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील दिव्यांग, विधवा महिला तसेच निराधारांचा शोध घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या 600 किटचे वाटप करण्यात आले...या कार्यक्रमासाठी संस्थेचे आधारस्तंभ किसनलाल केला, केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर च्या मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला, चतुर्भुज केला, प्राचार्य विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, पर्यवेक्षिका अर्चना कुलकर्णी,  प्राध्यापक अमित  धूत, राजेश आठवले, योगेश घाटोळे, राजेश लोहिया यांच्यासह बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष केला, भूपेंद्र अवचार, उगले हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.....

Previous Post Next Post