मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री.उदय सावंत यांनी शिक्षण विभागांतर्गत शुभारंभ केलेला प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर्स या अभिनव उपक्रमाला महाराष्ट्रात सुरूवात झाली.संपुर्ण महाराष्ट्रात हा अभिनव उपक्रम व्यापक स्तरावर सुरू आहे.या अभिनव उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व शाळांचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी जवळपास २ लाखांपेक्षा अधिक व्हिडिओ शेअर केले आहेत.त्यामुळे निष्काळजीपणे कचरा फेकणाऱ्यांना तसेच थुंकणाऱ्यांना आळा बसेल.महालक्ष्मी उत्सव, गणेशोत्सव या दरम्यान लोक बेफिकीर होऊन निष्काळजीपणे कचरा टाकतात.विद्यार्थी अशा लोकांना थांबवून वेळीच त्यांची चूक लक्षात आणून देतात.त्यामुळे कचरा फेकणाऱ्यांना आणि कुठेही थुंकणाऱ्यांना या कृतीने आळा बसत आहे.या अभिनव उपक्रमात एन.व्ही.चिन्मय विद्यालय कनारखेड शेगांव सहभागी असून विद्यार्थी दररोज आपले मजेशीर अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल करत आहेत.या अभिनव उपक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सुध्दा आपल्या मुलांचे व्हिडिओच्या माध्यमातून कौतुक करत आहेत.तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा तसेच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी एन.व्ही.चिन्मय विद्यालयाचे शिक्षक सुध्दा आपले व्हिडिओ व्हायरल करत आहेत.या अभिनव उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असून एन.व्ही.चिन्मय विद्यालय कनारखेड शेगांव येथील मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी प्रोजेक्ट लेट्स चेंज, स्वच्छता मॉनिटर्स या उपक्रमाच्या राज्य स्तरावरील समितीचे सदस्य असून त्यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी आहे.एन.व्ही.चिन्मय मधील विद्यार्थ्यांच्या,पालकांच्या,शिक्षकांच्या लक्षणीय सहभागाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला.त्याचबरोबर हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट लेट्स चेंज उपक्रमाचे प्रमुख श्री.रोहीत आर्या प्रामुख्याने लक्ष देत आहेत.तसेच बुलडाणा जिल्हा समन्वयक मंगेश भोरसे असून ते सुद्धा वेळोवेळी पर्याप्त सुचना आणि मार्गदर्शन करत असतात.जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुध्दा प्रामुख्याने या अभिनव उपक्रमावर लक्ष देत आहेत.तसेच विद्यालय स्तरावर, आणि राज्य स्तरावर विद्यालयाची तसेच विद्यार्थ्यांची निवड व्हावी यासाठी शाळा समन्वयक योगेश बेलोकार जबाबदारीने कार्य करत आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांचे व्हिडिओ तयार करण्याचे कार्य हरिष जाधव करत आहेत.या अभिनव उपक्रमाला शेगांव मधून व्यापक स्तरावर पाठींबा मिळत असून नागरिक या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करत आहेत.या अभिनव उपक्रमात बुलडाणा जिल्ह्याचा लक्षणीय सहभाग बघता शेगांव शहराची निवड मॉडेल टाऊन म्हणून करावी अशी महत्वपूर्ण विनंती प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी मुख्यमंत्री महोदयांना केली हे विशेष.त्याचप्रमाणे दिनांक २ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण होत असून , राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हे आणि शाळा घोषित केल्या जातील.त्यापुढे " प्रत्येक विद्यार्थ्याला कायमस्वरूपी स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची, असामाजिक कृत्य पाॅईंट आऊट करण्याची सवय होण्यासाठी अभियानाचा हा दुसरा टप्पा असेल." असे महत्वपूर्ण प्रतिपादन प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी केले.
प्रोजेक्ट लेट्स चेंज अभियानांतर्गत निष्काळजीपणे कचरा फेकणाऱ्यांना बसेल आळा..जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत शाळांमधून विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
