भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बढे यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी जिल्हाध्यक्ष आ राजेंद्र पाटणी यांच्या मान्यतेने तालुका मंडळ अध्यक्षसह वाशिम जिल्हा भाजपाची जिल्हा कार्यकारणी जाहीर केली असून, त्यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील सामाजिक कार्यकर्ते गंगादीप नारायण राऊत यांची किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.शेतकऱ्या बद्दल तळमळ असणारे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी, व समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या वयवाटीच्या रस्त्या करिता राऊत हे संघर्ष करीत होते. तसेच वेळोवेळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची तळमळ असायची, त्यांच्या शेती व शेतकऱ्यांप्रती तळमळ असलेल्या, त्या कामाची दखल घेत भाजपा ने जिल्हा किसान मोर्चा ची त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की आपण भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बडे, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजेंद्रजी पाटणी, आ लखनभैया मलिक, माजी आ विजयराव जाधव, माजी खा अनंतराव देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजू पाटील राजे, पुरुषोत्तम चितलांगे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव विनोद पाटील जाधव, महामंत्री नागेशभाऊ धोपे व जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात किसान मोर्चाची संघटनात्मक बांधणी करणार असून, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकार दरबारी शेतकऱ्यांच्या विविध समस्या अवगत करून देणार. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मंगरूळपीर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले.
भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी गंगादीप राऊत
विश्वास कुटे / वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
