आसेगाव पो. स्टे वार्ताहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत पिंपळगाव ईजारा मार्फत गावातील अपंगांना येथील सरपंच अविनाश राठोड व उपसरपंच अक्षय टोपले यांच्या हस्ते अपंगांना साहित्याचे वाटप करण्यात आले शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत निधीतून अपंगांना चार टक्के निधी खर्च करण्याचा अधिकार दिला आहे त्यानुसार येथील ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश राठोड व उपसरपंच अक्षय टोपले यांनी अपंगांना काही दिवसात थंड पाण्याची आवश्यकता असते त्यानुसार येथील अनेक अपंगांना ग्रामपंचायत मध्ये बोलावून त्यांना ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश राठोड यांनी पाणी बॅरेल चे वाटप केले आहे अपंग लाभार्थी रामदास मोकळे सुमनबाई हिंगणकर शितल जाधव सुनील भगत निलेश राठोड अशोक शिंदे सिद्धार्थ भगत इत्यादी लाभार्थ्यांना पाणी प्यारेलचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायतचे सदस्य व सचिव हे यावेळी उपस्थित होते अपंगांना पाणी बॅरेलचे वाटप करण्यात आली त्यावेळी अपंग लाभार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते
पिंपळगाव इजारा येथे ग्रामपंचायत मार्फत अपंगांना साहित्याचे वाटप...
विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
