इंझोरी आपतकालीन सदस्यांच्या वतीने अपघात टाकण्याकरिता कारंजा मानोरा रस्त्याची केली स्वच्छता कारंजा मानोरा या रोडवर असणाऱ्या सोहळ अभय अरण्य मध्ये असणाऱ्या घाटावर रस्ता दुरुस्ती दरम्यान या ठिकाणावर सिमेंट काँक्रेट चे मटेरियल सांडल्याने चढावर चढणाऱ्या व उतरणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याच्या बऱ्याच घटना या ठिकाणावर घडल्याने इंझोरी आपातकालीन सदस्य अजय ढोक यांच्यासह काही नागरिकांनी या ठिकाणावर 1 आक्टोंबर रोजी 1 घंटा श्रमदान करून स्वच्छता केली.कारंजा मानोरा नव्यानेच चमकदार बनणाऱ्या या रस्त्यावर सोहळ अभयारण्य मधील घाटावर मागील कित्येक दिवसापासून या ठिकाणावर चढाई करणारे सिमेंट काँक्रीट चे जड वाहन चढत असताना यामध्ये असणारा काँक्रीट चा माल या चळवळीच्या ठिकाणी पडल्याने हा रस्ता गिट्टी व रेती मिश्रित झाला होता या रस्त्यावर चढाईवर चढणाऱ्या वाहनांना कसरत करावी लागत असे तर उतरणारे वाहन भरधाव असल्यामुळे या रेती गिट्टी मिश्रित रस्त्यावरून स्लिप झाल्याने या ठिकाणावर अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या ह्या अपघातग्रस्तांना इंझोरी आपातकालींचे सदस्य अजय ढोक यांनी वारंवार या ठिकाणी येऊन अपघात ग्रस्तांना मदत करू त्यांना रुग्णालयात पोहोचण्याचे काम केले होते करिता त्यांनीच आज 1 आक्टोंबर रोजी स्वच्छता ही सेवा या शासनाच्या उपक्रमाद्वारे इंजोरीतील काही सहकारी मित्र घेऊन यांनी या ठिकाणी श्रमदान करून हा गिट्टी रेती मिश्रित असणारा रस्ता स्वच्छ करून यानंतर या ठिकाणी अपघात होणार नाही याची दक्षता घेत 1 घंटा श्रमदान केले या श्रमदानामध्ये इंझोरी येथील महेंद्र पदमने, जयदीप डोंगरे, सुनील दाभाडे, अतुल पिंजरकर, चेतन डोईफोडे, विशाल बारसाके, बबन तिडके, चव्हाण साहेब, प्रकाश राठोड, गजानन बिहाडे, हितेश ढोरे, रवी दैवत, ओम मात्रे यासह आपातकाली चे सदस्य अजय ढोक यांनी श्रमदान केले व स्वच्छता ही सेवा चा संदेश दिला.
खरोखरच इंझोरी आपतकालीन सदस्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच खरोखरच अशाच पद्धतीचे स्वच्छता अभीयान राबविण्याचे संदेश मिळाले आहे...
विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
