सम्यक विद्यार्थी आंदोलन खामगाव तालुका व शहर कार्यकारिणी साठी मुलाखत कार्यक्रम संपन्न...


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

 स्थानिक T.M.C हॉल कॉटन मार्केट येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी  वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाच्या वतीने खामगाव तालुका व शहर कार्यकारिणी साठी मुलाखत कार्यक्रम संपन्न.कॉलेज तिथं शाखा या उपक्रमाद्वारे संपूर्ण खामगाव तालुका सम्यकमय करणार व जिथं विद्यार्थ्यांवर अन्याय तिथं सम्यक विद्यार्थी आंदोलन खंबीर पने विद्यार्थ्यांच्या सोबत उभी राहिलं आणि जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन मध्ये सहभागी व्हा असे आव्हान या प्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहितदादा दामोदर यांनी केले, या कार्यक्रमाचे नियोजन सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा सचिव राजदादा वानखडे यांनी केले.या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे यांनी सदिच्छा भेट दिली व स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नवर चर्चा केली व येणाऱ्या काळात वंचित युवा आघाडी व सम्यकच्या वतीने मोठा लढा युवक-विद्यार्थी प्रश्नावर उभारणार असे सांगीतले, या वेळी वंचितचे नेते गिरिशभाऊ उमाळे, वंचितचे युवा जिल्हा सदस्य पवन तेलंग , प्रफुल्ल वानखडे , सुमित सावंग, सुशिल मोरे , सुमेध वानखडे, अरविंद खंडारे , अजय इंगळे, अभिषेक तायडे, मंगेश वारुडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post