जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद शहरामध्ये अजय चांडक यांच्या स्वस्त धान्य दुकाना मध्ये आनंदाच्या शिधा वाटपास सुरू झाले आहे.राज्य सरकारने रास्त भाव दुकानांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे, यामध्ये 1 किलो साखर 1 किलो खाद्यतेल, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो पोहे, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो रवा, अशा सहा वस्तू 100 रुपयांमध्ये लाभार्थी कार्ड धारकांना मिळणार आहे. त्यामुळे दिवाळी भाऊबीज सण ग्रामीण भागामध्ये जनतेला आनंदाचा शिधा वेळेवर उपलब्ध झाल्याने दिवाळी नक्कीच गोड होणार आहे त्यामुळे कार्डधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आनंदाचा शिधा वाटप प्रसंगी वेळेस आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक तथा माजी नगरसेवक निलेश शर्मा, स्वस्त धान्य दुकानदार अजय चांडक, लाभार्थी अनंता कोथळकर, लक्ष्मण वंडाले, प्रल्हाद ताडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.