ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा लाड अंतर्गत येत असलेल्या ग्राम उंबर्डा बाजार येथे पोलीस दूरक्षेत्राचे नूतनीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चनसिंह यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा लाड अंतर्गत येत असलेल्या उंबर्डा बाजार पोलीस चौकीचे बांधकाम अंदाजे ४३ वर्षापूर्वी तरुण युवक मंडळी व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिवा जळू दे सारी रात' या नाट्य प्रयोगाच्या मानधनातून मिळालेल्या निधीतून सदर पोलीस चौकी बांधकामासाठी तरुण युवक मंडळी व तत्कालीन पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस चौकीचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सदर मोडकळीस आलेल्या पोलीस चौकीचे नूतनीकरण करण्यास गावकरी मंडळी व नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करून दि. ६ ऑक्टोबर रोजी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उंबर्डा बाजार चौकीचे जमादार विनोद महाकाळ यांनी केले. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित मंडळी, पोलीस पाटील, पत्रकार व सहाय्यक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार, पो.काॅ. महेंद्रसिंग ठाकूर, पो.काॅ. विनोद राठोड, पो.काॅ. गायकवाड तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पो.काॅ. मनोज गोपने, पो.काॅ.चेतन गावंडे, पो.काॅ. कपिल सुळके यांनी प्रयत्न केले व अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
उंबर्डा बाजार चौकीचा नूतनीकरण सोहळा संपन्न..जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या शुभहस्ते...
विश्वास कुटे/वाशिम जिल्हा प्रतिनिधी...