मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिशय दुर्मिळ भागात राहणारा सोनू बेठेकर (सोनकलाल) यांनी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला असता . या स्पर्धेत विविध खेळ प्रकारामध्ये उज्वल कामगिरी करत दोन सुवर्ण व दोन रजत पदक प्राप्त केले .26ते 31ऑक्टो 2023 दरम्यान दुबई पोलिस क्लब, अल झहरावी या ठिकाणी पहिली ओपन इंटरनॅशनल चॅम्पियन्सशीपस्पर्धा पार पडली.5K.M Walk Race Run मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. व 400 मीटर मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले . दोन रजत पदक अनुक्रमे 1500 मीटर आणि गोळा फेक मध्ये, रिले ला सुध्दा सहभागी होऊन चौथा क्रमांक पटकावला. असे एकूण चार पदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये 13 देशामधील खेळाडूंनी सहभागी नोंदवला होता . सोनू बेठेकर यांना पुढील वाटचाली करिता मेळघाट वासियानी शुभेच्छा दिले आहे.त्याच्या रायपूर गावातील सर्व मित्र मंडळी, विद्यार्थी व पालक, शिक्षक वर्ग बंधू अधिकारी गण.... रायपूर गावातील सरपंच मॅडम, उप सरपंच, सर्व ग्राम पंचायत सदस्य गण मोबाईल ऑपरेटर,ग्रामपंचायत कर्मचारी, आश्रम शाळा रायपूर येथील कर्मचारी, वनविभाग कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर येथील कर्मचारी, तलाठी साहेब, जि. प. प्राथमिक शाळा शिक्षक वर्ग, रायपूर गावाचा नाव रोशन केल्याची बातमी कळताच त्यांच्या राहत्या गावी रायपूर येथे येथिल नागरिकांनी एकच जल्लोष केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेळघाटातील सोनू बेठेकर यांच्या अथक प्रयत्नाने सुवर्ण पदक व रजत पदक प्राप्त...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...