जळगाव जामोद प्रतिनिधी:-
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या जामोद ग्रामपंचायती वर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असुन आज पाच नोव्हेंबरला झालेल्या जामोद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक निकालात सरपंच पदासाठी महाविकास आघाडी च्या उमेदवार सौ गंगुबाई पुंडलिक दामधर व भाजप प्रणित पॅनलच्या उमेदवार सौ अर्चना रामेश्वर राऊत यांचा सौ गंगुबाई दामधर यांनी १०५१ मतांनी पराभव करत विजय मिळवला असुन यासह येथील ग्रामपंचायतच्या सतरा जागेमधचन भाजपला फक्त चारच जागांवर विजय मिळवता आला तर उर्वरित 13 जागेवर काँग्रेस, राष्टवादी कॉग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी प्रणीत ग्रामविकास आघाडी पॅनल च्या उमेदवारांसह कॉग्रेसच्या सौ गंगुबाई पुंडलिक दामधर यांचा दणदणीत विजय झाला.यामध्ये विजयी उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक मध्ये कुवर योगेश गजानन,धुर्डे शिवनारायण अनंता, धुर्डे उषा मोहन प्रभाग क्रमांक दोन मध्ये भगत राम मोहन प्रमिला रमेश हागे कविता अनंता हांडे प्रभाग क्रमांक तीन मध्ये अरुण बाबन पारवे,शेख फरहानानुर आयुब शेख, शेख रफिक शेख रउफ, मोहम्मद कुशीद बानो, याकूब शेख, सुमया परवीन सुलतान, बोडखे कैलास गणपत, आशिष पुरुषोत्तम राठी, पूजा केशव काळपांडे,बशीर खा छोटे खा,सत्यभामा संतोष चव्हाण, सविता राजू ढगे,कुवरदेव ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून जुमानसिंग पावरा हे 106 मताने विजयी झाले तसेच सदस्य म्हणून रितूबाई रमेश सत्या ह्या विजय झाल्या.ग्रामपंचायत तिवडी अजमपुर येथे लहू झालटे हे 21 मताने सरपंच पदासाठी विजयी झाले. तर गुणवंत दयाराम घाटे,सौ शारदा आनंदा, ज्योती प्रशांत झाल्टे, या अगोदरच अविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.