चिखलदरा तालुक्याच्या पायथ्याशी असलेले अचलपूर तालुक्यातील आदर्श देवगाव येथिल ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडुकिच्या पूर्व संध्येला गावातीलच एका इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक काट्याची टक्कर व दोन्ही गटाचा जोरात प्रचार सूरू असताना निवडनुकिच्या रणधुमाळीत रात्री माजी सरपंच गजानन येवले यांच्या शेताच्या कोठ्यावर काही लोक दारु पिउन नशेत भांडत झाले व त्या हातापाईत राजु नारायन येणे वय 52 ह्याचा मृत्यु झाला रात्री एक वाजता मय्यतच्या मृतदेहाला ला पोलिस गाडीत टाकुन नेत असताना गर्दितिल एका युवकाने मृतकाच्या साळ्याला फोन केला त्याचा साळा नामे लक्ष्मण शनवारे 42 यांनि बाडी गाडीत टाकु नका माझ्या बहिनिला व मृतकाच्या मुलाला येऊ दया म्हटले असता पोलीसानि त्याला बेदम मारहान केली व त्याला हि गाडीत बसवुन घेतले होते नंतर समोर काही महिला नि गाडी थांबविली असता लक्ष्मण ला खाली उतरविले.
देवगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला इस्माची हत्या...
राजु भास्करे/अमरावती जिल्ह्य प्रतिनिधी...