मोहम्मद इम्रान पटेल, उर्दू स्कूल अकोटचे शिक्षक, नासिर शाह वजीर यांना कौमी उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने २९ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गालिब आकॅडमी, नवी दिल्ली. शिक्षक नासिर शाह यांचा गौरव करण्यात आला, नवीन पिढीला शैक्षणिक प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियम, योजना आणि उपक्रमांमध्ये शिक्षक नासीर शाह यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. या सन्मानासाठी देशाचे २० राज्यचे अधिक शिक्षकांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सालेहा रशीद, अलाहाबाद विश्वविधापीठ, .मौलाना डॉ. अब्दुलमालिक, मिल्ली परिषद अध्यक्ष, दिल्ली, प्रोफेसर स्वालेह चौधरी, जम्मू काश्मीर विद्यापीठ, मुफ्ती मोहम्मद साजिद हुसेन, दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. कौमी उर्दू शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वसील गुर्जर, राष्ट्रीय उपाध्यक्ष सैय्यद महताब इब्राहिम, प्रदेश अध्यक्ष आबेद खान सर, महाराष्ट्र सरचिटणीस जैन उल आबेदीन सर,कनीज फातिमा यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र, काश्मीर, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा विविध राज्यातील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते, अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.
शिक्षक नसीर शाह यांचा राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मान...
सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...